पहलगामध्ये परदेशी पर्यटकांची उपस्थिती   

श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये एका नेपाळी पर्यटकाचाही समावेश होता. या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीरला पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या चार दिवसांमध्ये बऱ्याच पर्यटकांनी आपला दौरा अर्धवट सोडत घराची वाट धरली.
 
दहशतवादी हल्ला होऊनही काही परदेशी पर्यटकांनी पहलगामला भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. जम्मू आणि काश्मीर व भारताबाबत बोलताना काही परदेशी पर्यटकांनी भारताचे सौंदर्य पाहायचे आहे, अशी भावना व्यक्त केली आहे. पहलगामला आलेल्या रेनाटा या क्रोएशियन पर्यटकाने पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, “नुकतेच काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचे ऐकले होते, तरी आम्ही येथे येण्याचा निर्णय घेतला. आम्हाला तुमचा देश पहायचा होता, आम्हाला लोकांना भेटायचे होते, तुमच्या देशाचे सौंदर्य पहायचे होते. येथे भेट दिल्याचे आम्हाला समाधान आहे''.

Related Articles